Click here to see Marathi Shala Level-1 Essays


A2MM Novi Marathi Shala is in session for the year 2023-2024. Read the details of our Shala below.

1. Registration is open and will remain open all year.

2. A2MM membership is NOT required to participate in the Marathi Shala.

3. A2MM Marathi Shala goes virtual for the academic year 2023-2024.

4. Classes will be conducted online from September 2023.

5. Classes are being conducted for all ages following an organized curriculum

6. For registration questions contact : Lini Athavale e-mail: Linim.athavale@outlook.com Cell Phone: (248) 980 3736

7. Register your child online below

 
This is the 7th year that the Shala is in session and we hope to continue our service to the Marathi community. Read some detailed history of Shala so far.
 
 
 

मिशिगनमधील ऍनआर्बर मराठी मंडळ संचालित मराठी शाळा

फार मोठ्या संख्येने मराठी कुटुंब डेट्रोईट व आजबाजुच्या शहरांमध्ये राहतात. २०१४ साली जेव्हा मराठी शाळा सुरु झाली त्या पहिल्याच वर्षी पालकांचा भरघोस प्रतिसाद या उपक्रमाला मिळाला. ३/४ वर्षे वयापासून १३/१४ वर्षे वयापर्यंतचे विविध इयत्तांमधील विद्यार्थी जानेवारीमध्ये म्हणजे शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर सुरु झालेल्या या शाळेत उत्साहाने दाखल झाले.

मराठी शाळेला सुरुवातीपासूनच पालकांची खंबीर साथ मिळाली. शिक्षक म्हणून व पडद्यामागे करण्याच्या अनेकविध कामांमध्ये पालकांनी भरभरून मदत देऊ केली. शाळेमध्ये केवळ मुळाक्षरे व अंक गिरवण्याचे शिक्षण न देता विविध खेळ, स्पर्धा, गोष्टी या द्वारे मुलांना मराठीची ओळख वेगळ्या पद्धतीने करून देऊन त्यांना समरसून सहभागी केल्याने त्यांचा उत्साह नेहेमीच वाढत राहिला. दोन वर्षे सातत्याने संपूर्ण मराठी वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले गेले ज्यामध्ये नाटुकली सादर करताना ससा कासवाची गोष्ट सांगितली, भाज्या – फळांच्या शेतात सफर केली आणि योग्य आहाराचं महत्व सहजरीत्या समजावून दिलं , सुंदर अर्थपूर्ण मराठी गाणी सादर केली. मराठी खेळांच्या स्पर्धा, श्लोकपठण, शाळेच्या मुलांनी रंगवलेल्या चित्रांचा BMM कॅलेण्डर मध्ये सहभाग, सर्व मुलांनी मिळून “चिंटू” सारखा धमाल मजेदार मराठमोळा सिनेमा पाहणे अशा विविध गोष्टींमुळे मुलांना शाळेची अधिकच ओढ वाटू लागली.

मराठीची गोडी लागावी म्हणून काही स्थानिक कुटुंबांनी त्यांच्या घरच्या ग्रंथसंग्रहातील विशेषतः लहान मुलांसाठी भारतातून आणलेली पुस्तके शाळेला देणगीदाखल दिली. अशा शंभराहून अधिक पुस्तकांचा ग्रंथसंग्रह आज शाळा विद्यार्थ्यांना वाचनाचा सराव करण्यासाठी उपलब्ध करून देते.

आकडेवारीच सांगायची तर आज शाळेची एकूण विद्यार्थी संख्या ४२ आहे. यापैकी १६ विद्यार्थी भारती विद्यापीठाची पहिली परीक्षा तसेच ७ विद्यार्थी भारती विद्यापीठाची दुसरी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. शाळेत वेगवेगळ्या गटांना आठ शिक्षक शिकवतात. पुढे येणाऱ्या वर्षांत शाळेची आणि विद्यार्थ्यांची प्रगती अशीच अखंड व्हावी यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्नशील आहोत.